2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

ग्राहक भांडार

विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार

  • नूतन विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार म. सेलू हे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या अंतर्गत शिक्षक व विद्यार्थी यांच्या सभासद तत्वावर चालू आहे. या भांडाराची स्थापना १७-०२-१९८२ ला झाली आहे.

  • सहकारी तत्वावर भांडार चालवले जाते. "बिना सहकार नही उद्धार" म्हणी प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य माफक दरात देणे हे ब्रीद आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी ह्या भांडाराचे सभासद आहेत.

  • सभासद संख्या शिक्षक ६० व विद्यार्थी सभासद ११८० आहेत. भाग भांडवल २६००० रु. असून कोणतेही कर्ज  भांडार घेत नाही.
  • भांडारास स्थापन होऊन आज ३२ वर्ष पूर्ण झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक हे पद सिद्ध अध्यक्ष आहेत.
  • ३१/०३/२०१३ पर्यत ऑडीट झाले असून ८००,००० उलाढाल होते.
  • व्यापारी नफा ७२,००० रु. आहे. भांडाराला तीन कर्मचारी आहेत. १० संचालक आहेत. शाळेच्या परिसरातच भांडार आहे. सहकाराची परंपरा टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न संस्था करते.