2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

बालभवन विज्ञान केंद्र

बालभवन विज्ञान केंद्र

मानव विकास योजनाअंतर्गत "बालभवन विज्ञान केंद्र" शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून प्रशालेतील वन्दे मातरम सभागृहात सुरु करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण करणे, साध्या, सोप्या प्रयोगातून, प्रतीकृतीमधून विज्ञान विषयक संकल्पना समजून घेण्यासाठी बालभवन विज्ञान केंद्रातील सर्वच उपकरणे अत्यंत उपयुक्त आहेत.

बालभवन विज्ञान केंद्रात वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती देणाऱ्या उपकरणांची मांडणी करण्यात आली आहे. सेलू शहर तसेच आजू-बाजूचा परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी बाल भवन विज्ञान केंद्रास भेट देण्यासाठी नियमितपणे येतात.

शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये ४१०० विद्यार्थ्यांनी तर शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये ६०२४ विद्यार्थ्यांनी जाने २०१४ पर्यंत बालभवन विज्ञान केंद्रास भेट दिली.