2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त

नूतन विद्यालयात राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूचा गौरव

नूतन विद्यालयाच्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेतील रौप्यपदक प्राप्त खेळाडू चि. सौरभ माळवे यास शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ना. विनोद तावडे यांचे कौतुकपर शुभेच्छा पत्र व भेट वस्तूचे वितरण दि. १८ मार्च २०१५ रोजी सत्कार सोहळ्यात करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, प्रमुख पाहुणे सहसचिव डी. के. देशपांडे, डॉ. व्ही. के. कोठेकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण जोग, प्रभारी मुख्याध्यापक एन. पी. पाटील, अनिल कुलकर्णी, पंजाब खडसे हे उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. कोठेकर म्हणाले क्रीडाक्षेत्रातील नैपुण्यपूर्ण कामगिरीतून खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर शाळेचा नावलौकिक वाढविला असून त्याची नोंद मा. ना. विनोद तावडे यांनी घेऊन कौतुकपर शुभेच्छा पत्र व भेट देऊन केले आहे. सर्व खेळाडूंनी सातत्याने सराव करून अभ्यासासोबत क्रीडा क्षेत्रात आपले नाव उज्वल करावे. कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक सचिदानंद डाखोरे यांच्या स्वागत गीताने झाली. क्रीडामंत्र्याच्या शुभेच्छा पत्राचे वाचन डी. डी. सोन्नेकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चि. सौरभ माळवे चा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू, बेसबॉल रौप्यपदक प्राप्त विनायक काकडे, टेनिस व्होलीबॉल सुवर्ण पदक प्राप्त ऋषीकेश माने, जंप रोप रौप्यपदक प्राप्त निलेश माळवे, वासुदेव सोन्नेकर, राष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत निवड झाल्या बद्दल कु. रेणुका सोन्नेकर यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश नावाडे, सुरेश हिवाळे, यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश मालवे यांनी मानले.