2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

News

क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारश्री. गणेश माळवे याना पुरस्कार प्रदान

क्रीडा व युवक संचालनालय म. रा. पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या वतीने दि. २६ जाने. २०१७ रोजी शासकीय ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नूतन विद्यालयातील शिक्षक श्री गणेश माळवे याना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल, पोलीस अधीक्षक नियती ठाकर जिल्हा क्रीडाधिकारी सी. व्ही. साखरे हे उपस्थित होते. श्री गणेश माळवे हे नूतन विद्यालयात २० वर्षांपासून क्रीडाक्षेत्रात कार्यरत असून व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, तलवारबाजी, टेनिस व्हॉलीबॉल, सेपक टकरा खेळात अनेक राज्य / राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

टेनिस व्हॉलीबॉल खेळात भारतीय संघातील भूतान, नेपाळ दौऱ्यावर खेळाडू प्रशिक्षक म्हणून कार्य केले. या खेळाच्या महाराष्ट्रात प्रचारक म्हणून कार्य करत आहे. या करीत उत्कृष्ट कामगिरीवर जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला.