2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

News

गुणवंतांचा सत्कार 2020

'नूतन' मध्ये विविध स्पर्धेतील गुणवंतांचा सत्कार

कै. श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या रंगभरानं स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पदक प्राप्त विद्यार्थी, समूह नृत्य विजेता संघ, शिष्यवृत्ती सराव परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी यांचा गौरव मंगळवारी (२८ जाने. २०२०) नूतन विद्यालयात करण्यात आला.

यावेळी अध्यक्षस्थानी नूतन शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहणी यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर प्रमुखपाहुने म्हणून संस्थेचे माजी सचिव ताठ प्राचार्य द. रा. कुलकर्णी, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मा. मा. सुर्वे, पर्यवेक्षक रामकिशन मखमले, आर. एन. सोनेकर यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना प्राचार्य कुलकर्णी म्हणाले , "या शाळेतील विद्यार्थी नेहमीच कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यश संपादन करून शाळेचा व संस्थेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवतात." श्री. बिहणी यांनी यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले, तर आभार चित्रकला विभागप्रमुख आर. डी. कटारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी देविदास सोनेकर, गणेश माळवे, बाबासाहेब हेलास्कर, फुलसिंग गावित, विरेश गाडगे, सुनील तोडकर, आरती कदम, वर्ष कदम, सूर्यकाला सूर्यवंशी, सच्चिदानंद डाखोरे आदींनी पुढाकार घेतला.