2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

News

चित्रकला स्पर्धेचे आयोजन 2020

ऑनलाईन, ऑफलाईन चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद

सेलू शहराचे पहिले नगराध्यक्ष तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे संस्थापक श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंती निमित्त  निवडक स्पर्धकांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवारी दि. २० डिसेम्बर २०२० ला नूतन विद्यालयात करण्यात आले होते.

या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया , सचिव डी. के. देशपांडे, सह सचिव डॉ. व्ही. के. कोठेकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रा. बिराजदार, मुख्याध्यापक अशोक वानरे, संगीता खराबे, आर. जी. मखमले,  आर. एन. सोन्नेकर, एन. वाय. सोळंके, एन जी. बंगाळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.

शहरातील नूतन इंग्लिश स्कुल, व्हिजन इंग्लिश स्कुल, प्रिन्स इंग्लिश स्कुल, यासर उर्दू स्कुल, स्वामी विवेकानंद शाळा, प्रिन्स अकॅडेमी आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हि स्पर्धा कोविड १९ संसर्ग लक्षात घेता अगोदर ऑनलाईन स्पर्धकाची चित्रे मागवून नंतर निवडक स्पर्धकांना बोलवून ऑफलाईन स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धेचे संयोजक आर. डी. कटारे, फुलसिंग गावित, सुरेश हिवाळे, काशिनाथ पल्लेवाड, अनंतकुमार विश्वम्भर आदींनी पुढाकार घेतला