2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

News

चित्रकला ग्रेड परीक्षा 2019७११ विद्यार्थ्यांचा सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या कला संचानालय मुंबईच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा बुधवारी (२७ नोव्हे. २०१९) नूतन विद्यालय केंद्रावर ७११ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या परीक्षेसाठी तालुक्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपला सहभाग नोंदविला. यात नूतन विद्यालय, नूतन कन्या शाळा, न्यू हायस्कुल, प्रिन्स इंग्लिश स्कुल, ज्ञानतीर्थ विद्यालय, व्हिजन इंग्लिश स्कुल, राजीव गांधी विद्यालय (ताडबोरगाव), नितीन माध्यमिक विद्यालय (आहेर बोरगाव), शारदा विद्यालय सेलू आदी शाळेतील ७११ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी नूतन विद्यालय केंद्रावर सेलू तालुक्यातून ४४० विद्यार्थी प्रविष्ट झाले. शुक्रवारी (३० नोव्हे. २०१९) इंटरमिजिएट परीक्षे साठी २६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक ताठ केंद्रप्रमुख अनिल कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मा. मा. सुर्वे, पर्यवेक्षक रामकिशन मखमले, रघुनाथ सोनेकर, कलाशिक्षक रामकिशन कटारे व फुलसिंग गावित, अरविंद आंबेकर, अश्विनी केंद्रे, शिल्पा बर्डे वर्ष कदम, सुनीता सांगोले, गजानन मुली, संभाजी रोडगे, सच्चिदानंद डाखोरे आदी शिक्षकांनी पुढाकार घेतला.