2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

News

मुख्याध्यापक पदी अशोक वानरे

नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी अशोक वानरे यांची तर उपमुख्याध्यापक पदी रामकिशन मखमले यांची निवड


दि. ०१ सप्टें २०२०, सेलू.

नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्या जागी अशोक वानरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपमुख्याध्यापक पदी रामकिशन मखमले आणि पर्यवेक्षक पदी नारायण सोळंके यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांना नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी संस्थेचे सरचिटणीस डॉ. व्ही. के. कोठेकर, चिटणीस डी. के. देशपांडे, जयप्रकाश बिहाणी, कार्यालय अधीक्षक नंदकुमार बंगाळे आदींची उपस्थिती होती.
त्यांच्या या नियुक्तीमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.