About Shri Ramji Bhangdiya
कै. श्री रामजी भांगडिया, सेलू शहराचे भाग्यविधाते व दलित मित्र. सेलू नगर पालिकेचे प्रत्यक्ष जनतेतून निर्वाचित झालेले प्रथम नगर अध्यक्ष होते. यांच्या दूरदृष्टीतून उदयास आलेली व स्थापन झालेली नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. महाराष्ट्र शासनाने त्यांना २६ मार्च १९७५ ला दलित मित्र ही उपाधी देऊन त्यांचा गौरव व यथोचित सन्मान केला.
सेलू येथे १९३९ पासून नूतन विद्यालय राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली. पुढे ते शाळेचे अध्यक्ष तसेच चिटणीस राहिले व संस्थेच्या कार्याला वाहून घेतले. विद्यालयाची सुमारे दीड लाख रुपये खर्च करून भव्य इमारत उभी करण्यात आली. विद्यार्थी संख्या प्रचंड वाढल्यामुळे दुसरा मजला बांधण्यात आला. भाईजीनी भंगी मुक्ती समाज बनविले म्हणून भारताला स्वच्छ करण्यासाठी शहरात ग्राम सफाई व स्वच्छता मोहीम राबविली. रस्त्यांचे सिमेंटीकरण करणे, महिला मंडळ, कामगार कल्याण केंद्र, हिंदी-मराठी ग्रंथालय इत्यादी इमारती स्थापन केल्या.