2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

अमृत महोत्सवआवाहन

माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिकांना
सस्नेह नमस्कार,

स्वातंत्र्य लढ्यातून उदयास आलेली, राष्ट्रीय कार्याला अग्रक्रम देणारी, दर्जेदार व गुणात्मक शिक्षणातून विद्यार्थी विकासाचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी नित्य धडपडणारी नूतन विद्यालय शिक्षण संस्था अमृत महोत्सव साजरा करीत आहे.

संस्थेने त्याग, सेवा व समर्पणातूनच जनमानसात आदराचे स्थान मिळवले. संस्थेच्या कार्याची दाखल घेत राज्य शासनाने आदर्श शिक्षण संस्था म्हणून संस्थेस सन्मानित केले. संस्थेचा हा लौकिक वृद्धिंगत करण्यात संस्था परिवारासोबतच संस्थेबद्दल आस्था असणाऱ्या आपणासारख्या माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक, सहृदांचा ही  मोठा  वाटा आहे हे संस्था जाणते.

या स्नेह भावनेतूनच संस्था अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपणाशी संवाद साधत आहे. अनेक उपक्रमासोबतच संस्थेने अमृत महोत्सव निमित्त आधुनिक तंत्रासह, व्हीडीओ कॉन्फेरेन्सिंगची सुविधा असणारे 70x140 चे सभागृह बांधण्याचा संकल्प  केला आहे. आपल्या आर्थिक सहयोगातून हे काम पूर्णत्वास जाईल असा संस्थेस विश्वास आहे. आपण उदार अंत:करणाने आर्थिक सहकार्य करावे ही नम्र विनंती.

  • रु. ७५,०००/-  किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या देणगीदाराचे नाव सभागृहाच्या दर्शनी भागात फलकावर लावण्यात येईल.
  • सभागृहाच्या पुर्णत्वानंतर येणाऱ्या ५ वर्षात रु. ७५,०००/- किंवा अधिक देणगीदारास हे सभागृह २ वेळा विधायक उपक्रम कार्यक्रमाकरिता उपलब्धेनुसार नि:शुल्क उपयोगात आणता येईल.
  • आपली देणगी संस्थेच्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद, शाखा सेलू च्या नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलू या नावे खाते क्र. ६२००९६७५१९० या खात्यात जमा करता येईल. (IFSC : SBHY0020022 )
  • देणगीच्या रकमेस आयकराच्या 80-G या कलमाखाली सवलत मिळेल.

अमृत महोत्सवानिमित संस्थेस आपणाकडून आर्थिक सहकार्य निश्चित मिळेल असा विश्वास आहे. सहकार्य करावे ही नम्र विनंती.

विनीत

द. रा. कुलकर्णी

चिटणीस

डॉ. एस. एम. लोया

अध्यक्ष

 

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. श्री. एस. एम. लोया :  अध्यक्ष, नूतन विद्यालय शि. सं. सेलू मो. ९४२३१४१७५५
अॅड. श्री. वसंतराव खारकर : उपाध्यक्ष, नूतन विद्यालय शि. सं. सेलू मो. ७३८७५७२४७२
श्री. द. रा. कुलकर्णी  : चिटणीस, नूतन विद्यालय शि. सं. सेलू मो. ९४०४५६४३८०
श्री. डी. के.  देशपांडे : सहचिटणीस, नूतन विद्यालय शि. सं. सेलू मो. ९४२३९३५९७९
डॉ. श्री. वि. खं. कोठेकर : सहचिटणीस, नूतन विद्यालय शि. सं. सेलू मो. ९४२१८६१८३३
श्री. जयप्रकाशजी बिहाणी : सदस्य, कार्यकारणी मंडळ, नू. वि. शि. सं. सेलू मो. ९४२२१७५१४९
श्री. नंदकिशोरजी बाहेती : सदस्य, कार्यकारणी मंडळ, नू. वि. शि. सं. सेलू मो. ९४२२१७५४२१