2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

प्राचार्य श्री द. रा. कुलकर्णीसमाजाला समृद्ध करणारी विधायक दृष्टी

महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, स्वामी रामानंद तीर्थ, दलितमित्र श्रीरामजी भांगडिया, अनंतराव भालेराव यांना प्रेरणास्त्रोत मानणारे, विधायकतेच्या मार्गावरील धडपडणारे एक आनंदी यात्रिक.
लोकशाही मूल्यावरती निष्ठा असलेले नि:स्वार्थ कार्यकर्ते, स्वातंत्र्य, समता, सचोटीचे उपासक, कार्याला शिस्तीच्या चौकटीत बसवून द्रुतगती देणारे कुशल प्रशासक, साधेपणा, संवेदना जपणारे नि जगणारे, नित्य नाविन्याची ओढ असलेले जिज्ञासू शोधक, विद्यार्थ्याच्या जीवनाच अत्यंत कालाबतुने गुणवत्तेचे संवर्धन करणारे, विद्यार्थ्याच्या हृदयात आदराच स्थान प्राप्त केलेले प्राचार्य, सेवानिवृत्तीनंतरही 'नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे' चिटणीस म्हणून कार्य करणारे, अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक चळवळीचे द्रष्टे मार्गदर्शक... म्हणजेच आदरणीय प्राचार्य श्री द. रा. कुलकर्णी.

दत्तात्रय रामराव कुलकर्णी

स्वागत, शास्त्री नगर
सेलू, परभणी (४३१ ५०३)
दूरभाष : (०२४५१) २२२०७९
भ्रमणदूरध्वनी : ९४०४५६४३८०

शिक्षण :
  • एम. ए. राज्यशास्त्र (१९५६), उस्मानिया विद्यापीठ
जीविका :
  • शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद येथे अंशकालीन व सहाय्यक प्राध्यापक (१९५६-५९)
  • जे. इ. एस. कॉलेज, जालना येथे राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागप्रमुख (१९६४-६५)
  • प्रभारी प्राचार्य, जे. इ. एस. कॉलेज, जालना (१९६४-६५)
  • उपप्राचार्य, जे. इ. एस. कॉलेज, जालना (१९६५-६८)
  • प्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख, नूतन महाविद्यालय, सेलू जि. परभणी (१९६८-९३)
पदे :
  • चिटणीस, बालसंस्कार प्रतिष्ठान, सेलू
  • स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय, सेलू जि. परभणीचे कार्यकारिणी सदस्य
  • अध्यक्ष, मराठवाडा सेवानिवृत्त संघटना, शाखा सेलू
  • सेलू येथे १०, ११, १२ जानेवारी १९९२ ला संपन्न झालेल्या अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे सरचिटणीस
  • नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस (१९९९ ते २०१६)
सन्माननीय सदस्य:
  • इंडिअन पोलिटिकल सायन्स असोसिएशन
  • मराठवाडा राज्यशास्त्र परिषद
  • मराठवाडा विद्यापीठ प्राचार्य संघ
  • मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य
  • मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या विकास परिषदेचे सदस्य
  • शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन
  • मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या पहिल्या सल्लागार मंडळाचे सदस्य
  • मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद सदस्य अधिसभा, सदस्य विद्या परिषद, सदस्य कला विद्याशाखा, सदस्य राज्य अभ्यास मंडळ, बोर्ड ऑफ अकौंटस, सदस्य बोर्ड ऑफ स्पोर्ट्स एंड फिजिकल एजुकेशन
महत्वपूर्ण योगदान:
  • १९७१-१९७३ या काळात मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या प्रसंगी पन्नास विद्यार्थ्यांना दत्तक घेतले.
  • दुष्काळ निवारण निधी उभारला
  • बेघरासाठी निवारण निधी उभारला
  • राष्ट्रीय एकात्मता समितीच्या विद्यमाने आंध्र, मध्यप्रदेश यांना भेटी व महाराष्ट्र दर्शन कार्यक्रम
  • सेलू मध्ये दोन सहकारी पतसंस्थांची स्थापना
  • गणेशोत्सव व्याख्यानमालेचे संयोजक आणि आयोजनात पुढाकार
  • श्रीरामजी भांगडिया व्याख्यानमालेचे संयोजक आणि आयोजनात पुढाकार
  • गरीब विद्यार्थ्यासाठी श्रीरामजी भांगडिया वसतिगृहाची उभारणी
  • नूतन महाविद्यालयात रौप्य महोत्सवी वसतिगृहाची उभारणी
  • राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग
  • विद्यार्थ्यासाठी स्वेच्छा ठेव योजना
  • वंदे मातरम सभागृहाची सेलू येथे निर्मिती
  • नूतन इंग्लिश स्कूलचा प्रारंभ
महत्वाचे समारंभ :
  • म. गांधी जन्मशताब्दी महोत्सव
  • नूतन महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव
  • नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सव
  • नु. वि. शिक्षण संस्था, सेलू चा हीरक महोत्सव
  • नु. वि. शिक्षण संस्था, सेलू चा अमृत महोत्सव
आकाशवाणी परभणीवरील कार्यक्रम :
  • सण-समारंभातून राष्ट्रीय एकात्मता -  चर्चा (इतर सहभागी प्रा. विश्वास वसेकर, प्रा. डॉ. जी. एस. गळ्गे)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यासंग भाषण सदरात मुलाखत
  • शैक्षणिक वाटचाल - आजचे पाहुणे या सदरात मुलाखत
  • हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे अग्रणी - स्वामी रामानंद तीर्थ - भाषण
  • असे घडलो आम्ही - डॉ. जी. एस. गळ्गे यांनी घेतलेली मुलाखत
पुरस्कार :
  • राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (१९८६-८७)
  • नूतन विद्यालय शिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाचा
    उत्कृष्ठ संस्था पुरस्कार (२००२)
  • शैक्षणिक कार्याकरिता बाबा आमटे
    गौरव पुरस्कार (२०१३-१४)
  • माजी विद्यार्थ्याकडून द. रा. कुलकर्णी यांच्या
    अमृत महोत्सव निमित्त सत्कार व नूतन महाविद्यालय
    सेलू येथे आय. टी. ट्रेनिंग सेंटरची उभारणी
  • शैक्षणिक उत्कृष्ठ कार्याबद्दल
    दलितमित्र कै. नारायणदादा रामदेव काळदाते
    पुरस्कार (२०१४-१५)
  • स्वामी रामानंद तीर्थ
    मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचा
    "जीवन साधना" गौरव पुरस्कार
    (२०१५)