2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

यशस्वी वाटचाल

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेने रौप्य, सुवर्ण, हिरक आणि अमृत महोत्सव साजरा करत ७५ वर्षाच्या वाटचालीचे सिहावलोकन केल्यास असे दिसते कि नव्या युगातील नवी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य संस्थेने जोपासलेले आहे. संस्थेच्या शैक्षणिक मूल्याची जोपासना करत, मूल्यांच्या संवर्धना साठी संस्था कार्यरत आहेत.

संस्था आजच्या स्पर्ध्येच्या युगात सकस, दर्जेदार आणि जीवनोपयोगी शिक्षण देण्यासाठी व तसा ध्यास असणारी संस्थेला मिळालेली उत्तुंग व्यक्तीमत्वाची मालिकाच लाभलेली आहे.

मराठवाडा विभागात स्वातंत्र्यानंतर जी शैक्षणिक चळवळ उभी राहिली या चळवळीत मराठवाड्यातील अग्रगण्य काही संस्थापैकी नूतन विद्यालय शिक्षण संस्था होय. शिक्षणाची गुणवत्ता टिकून ठेवणे व वाढीस लावणे. नव्या आव्हानांना सामोरे जाणे हे संस्थे चे प्रमुख कार्य आहे.

शिक्षणाचे मुलभूत हक्क तसेच दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण देण्यास संस्था कटिबद्ध आहे. हे सर्व करत असताना हे सर्व सामर्थ्य पेलण्याची जबाबदारी संस्था चालक, पदाधिकारी, कार्यकारी मंडळ , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांच्या बळावरच संस्था अमृत महोत्सवी वर्ष उत्साहाने साजरे करत आहे. शताब्दी  वर्षाकडे वाटचाल सुरु आहे.