2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

From desk of President

नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलू अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशात संस्थेने लौकीकाचे स्थान प्राप्त केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देश प्रेमातून उदयास आलेली हि संस्था त्याग व समर्पणातून पुढे विकसित झाली.

हाच संपन्न वारसा आम्ही पुढे नेत आहोत. बदलत्या काळानुसार नित्य नवे, आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार, शिक्षण मुलांना देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

संस्थेतील सर्व घटक संस्थेत असणा-या  संगणकाच्या संख्येत वाढ करणे, संगणक, इंटरनेट इत्यादी माध्यमातून मुलांच्या ज्ञान कक्षा विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. अमृत महोत्सवी वर्षात संस्था आपली वेबसाईट सुरु करीत आहे. त्या द्वारे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सर्व माजी विद्यार्थी, हितचिंतक, शिक्षणप्रेमी, नागरिक यांचे संपर्क नाते अधिक दृढ होईल असा विश्वास वाटतो.

संस्थेत गुणवत्तेवर आधारित मराठी मध्यम, सेमी-इंग्रजी माध्यमाद्वारेशिक्षण दिले जाते. महाविद्यालयीन स्तरावर इंग्रजी माध्यमातून वाणिज्य शाखेत अध्ययनाची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.

आगामी काळातील आव्हाने ओळखून संस्थेने इंग्रजी मध्यामची शाळा सुरु केली. संस्थेचा विद्यार्थी वैश्विक स्तरावर समर्थपणे समोर जावा असा या मागे उद्देश आहे. संस्थेच्या सर्वच घटक संस्थातून "गुणवत्तापूर्ण शिक्षण" यास प्राधान्य दिले आहे.

माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक, संस्था परिवारातील सदस्य या सर्वांच्या सहयोगातून एक अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सभागृह बांधण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. सर्व आधुनिक व नवतंत्राचा हे  सभागृह बांधताना उपयोग केला जाणार आहे. Video Conference ची सुविधा तेथे असणार आहे.

विद्यार्थी विकासासाठी संस्था प्रयत्नशील आहे. आपला ह्या संस्थेशी जिव्हाळा, स्नेह आहेच. आपण सर्वजण या अमृत महोत्सवात सहभागी होऊया. मी ही संस्थेचा माजी विद्यार्थी व आज संस्थेचा अध्यक्ष म्हणून सर्वाना शुभेच्छा देतो.

डॉ. एस. एम. लोया,

अध्यक्ष, नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलू