अपूर्व विज्ञान मेळावा 2018

नूतन विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात साजरा

दि. १६ जाने. २०१८ रोजी नूतन विद्यालय, सेलू येथे विज्ञान विभागाच्यावतीने अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उदघाटन सेलू येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. आशिष मेहता यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. व्ही. वाघमारे, उपमुख्याध्यापक श्री. कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री गाजरे व श्री. सुर्वे, विज्ञान विभाग प्रमुख श्री. सोळंके व सर्व शिक्षक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या विज्ञान मेळाव्यात शालेय अभ्यासक्रमातील प्रयोगाचे, उपकरणांचे सादरीकरण केले. शाळेतील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच विज्ञान विषयातील विविध संकल्पना, तत्व, नियम या प्रयोगातून सुलभ पद्धतीने स्पष्ट करून सांगितल्या. शाळेतील ई ५ वी ते १० वी तील सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव श्री डी. के. देशपांडे गुरुजी यांनी या विज्ञान मेळाव्यास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सौ. लड्डा व श्री. तोडकर यांनी या प्रयोगांचे परीक्षण केले. या अपूर्व विज्ञान मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री. व्ही. एन. क्षीरसागर, श्री. पांडे, श्री. मुळी, श्री. ए. ए. पाटील, सौ. सुभेदार, सौ आष्टीकर, सौ. दहिफळे, यांनी विद्यार्थ्यांना प्रयोग मांडणीसाठी मार्गदर्शन केले.

श्री. एन. वाय. सोळंके व श्री. पी. टी. कपाटे यांनी या विज्ञान मेळाव्याचे संयोजन केले. शाळेतील सर्व शिक्षकांचे विज्ञान मेळावा यशस्वी होण्यासाठी सहकार्य मिळाले.