2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

प्रशाला परिचय

नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलू अंतर्गत मुलींच्या शिक्षणाची स्वतंत्र सोय व्हावी या दृष्टीकोनातून दि. ०१ ऑगस्ट १९७३ रोजी प्रशालेची स्थापना झाली. दानशूर व्यक्ती लालजी रामजी यांची देणगी प्रित्यर्थ प्रशालेचे नामकरण "श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला" असे करण्यात आले आणि मुलींच्या शिक्षणाचे एक स्वतंत्र दालन सुरु झाले. सुरुवातील इ. ८ वी ते १० वी चे वर्ग सुरु करण्यात आले. सुरुवातीच्या काळात प्रशालेत केवळ १५ वर्ग खोल्या आणि ऐच्छिक विषय घेण्याची मुभा नव्हती.  १९८० पासून ५ वी ते ७ वी ची इयत्ता सुरु झाली. परंतु भौतिक सुविधे अभावी देखील विद्यार्थ्यांनी प्रगतीची शिखरे गाठतच होत्या. १० पर्यंत मुलीचे शिक्षण झाल्या नंतर मुलींच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न पालकासमोर उभा होता आणि त्यामुळेच पालकांच्या आग्रहास प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाबरोबर मुलींच्या उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी या साठी दि. ०१ जुलै १९८५ रोजी उच्च माध्यमिक विभागाची स्थापना झाली. श्रीमती तेजीबाई 

कन्हैयालालजी अग्रवाल (बामणीवाले) या दानशूर महिलेच्या देणगी प्रित्यर्थ्य उ. मा. विभागाचे नामकरण श्रीमती तेजीबाई कन्हैयालालजी अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्य. विभाग, सेलू  असे आहे.

प्रशालेचे पहिले मुख्याध्यापक श्री. सोनाजीपंत कुलकर्णी होते. A good teacher must know the pupils nature. विद्यार्थ्याच्या कलेने त्यांच्यातील गुणांना ओळखून त्यांच्या कलाविश्कारास वाव देणाऱ्या शिक्षकांच्या प्रशालेतील परंपरेने प्रशालेच्या यशाच्या शिखरात सदैव मानाचा तुरा खोवला गेला. गुणवंत शिक्षकांचे विद्यार्थी ही गुणवंत अशी यशाची परंपरा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त (श्री. सोनाजीपंत कुलकर्णी) शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनीही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत आहेत.

शैक्षणिक वर्ष १९८७ पासून इ. ८ वी पासून संस्कृत / हिंदी या दोन ऐच्छिक भाषा विषयांचा समावेश झाला. त्याच बरोबर २००२-२००३ पासून इ. ८ वी साठी सेमी इंग्रजी द्वारे गणित व विज्ञान हे दोन विषय इंग्रजीत शिकविले जाऊ लागले. तसेच २००५ पासून इ. ५ वी पासून सेमी इंग्रजी द्वारे गणित व विज्ञान विषय इंग्रजीत शिकविले जाऊ लागले. इ. ९ वी ( अ / ब) हे वर्ग सामान्य गणित साठी तर ९ वी (क/ड) उच्च गणित साठी करण्यात आले. तसेच इ. ९ वी साठी शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून आणि इ. १० वी साठी. शै. वर्ष २०१३-१४ पासून पर्यावरण बरोबर माहिती तंत्रज्ञान (ICT) हा विषय सुरु करण्यात आला.

इ. १० वी / १२ वी चा निकाल वाढण्याच्या दृष्टीने अतिरिक्त परीक्षा घेऊन विद्यार्थिनीच्या प्रगतीच्या दृष्टीने गुणवत्ता विकास प्रकल्प राबविण्यात आला. त्याचा सकारात्मक बदल दिसून आला. आणि प्रशालेच्या निकालात अमुलाग्र बदल झाला. त्यमुळे प्रशालेतील इ. ५ वी ते ८ वी च्या सेमी च्या वर्गासाठी ही गुणवत्ता विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे.

प्रशालेने यशाची शिखरे गाठली. मुलीनी राष्ट्रीय स्तरापर्यंत बाजी मारली. प्रशालेत मुइञ्चि संख्या वाढली. त्याच बरोबर वर्गखोल्या कमी पडत होत्या त्यामुळे शै. वर्ष २०१३-१४ मध्ये इमारतीचे नूतनीकरन करण्यात आले आणि प्रशालेची इमारत अद्यावत झाली. सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, पिण्याच्या पाण्याची (R O) व्यवस्था, संगणक कक्ष आदिद्वारे भौतिक सुविधानीही प्रशाला सज्ज झाली. एकूण वर्ग खोल्या सध्या प्रशालेत ३२ आहेत.

सामाजिक समस्यांची जाण व भान ठेवून प्रशालेत वेगवेगळे उपक्रम जसे जनजागरण फेरी, रक्तदान शिबीर, अपत्तीग्रस्ताना आर्थिक मदत इत्यादी द्वारे सामाजिक कार्यात सहभाग घेतला जातो. भूगोल छंद मंडळ, राष्ट्रीय हरित सेना आदि द्वारे पर्यावरण विषयक जागृतीही विद्यार्थिनीत केली जाते.