2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

सांस्कृतिक अहवाल २०१४-१५

विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी

शैक्षणिक वर्ष २०१४-१५ अंतर्गत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत साजऱ्या होणाऱ्या सर्व नेत्यांच्या, क्रांतिकारकाच्या, समाजसुधारकांच्या जयंत्या, पुण्यतिथी साजरी करण्यात आली व त्यानुषंगाने विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

  • ऑगस्ट २०१४ रोजी शालेय वर्धापनदिनानिमित्त स्पर्धा (चित्रकला, बुके तयार करणे) तसेच "वाटते आम्हा शाळा हवी" हि नाटिका बसविण्यात आली.
  • कथेचे निसिदन कसे करावे या संदर्भात धनंजय सरदेशपांडे यांनी "कथा जगूया" या कथा शिबिराचे सादरीकरण केले.
  • इ. १० व १२ वी तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनीचा "गुण गौरव समारंभ" आयोजित करण्यात आले.
  • "सर्व जल अभियान" या सकाळ  मध्यम समुह अंतर्गत "जल संकल्प" शपथविधी तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  • साने गुरुजी जयंती निमित्त अंतरशालेय कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. त्यानिमित्त किशोर विश्वामित्र यांनी विद्यार्ठीनिना मार्गदर्शन केले.
  • राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा बीड येथे पार पडली. त्यात प्रशालेच्या विद्यार्थीनिंनी "जाईच्या कळ्या"  नाटकाचे सादरीकरण केले.
  • विभागित वक्तृत्व स्पर्धेत प्रशालेस दहाल प्राप्त झाली. यशस्वी विद्यार्थिनी : कु. मोगल वैष्णवी हरिभाऊ, कु. जाधव जयश्री उद्धवराव
  • जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळातर्फे आयोजित विविध स्पर्धेत प्रशालेने घवघवीत यश  मिळविले.
  • अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, हेलस अंतर्गत आयोजित विभागीय सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थिनी तृतीय ठरल्या. कु. तरवडगे स्वराली, कु. वायाळ शिवानी शरद, कु. तमशेटे स्नेहल सदाशिव (१० ड) तर प्रशालेस उत्कृष्ट संस्था पुरस्कार तर प्रशालेतील सुरेश रणखांबे यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळाला.
  • विद्यार्थिनीच्या आरोग्यविषयक जिज्ञासा जागृती करण्यासाठी इ. ५ वी च्या विद्यार्थिनीसाठी प्रथमोपचार पेटी तयार करणे " ही स्पर्धा घेण्यात आली.