विद्यालय स्नेह संमेलन२०१४-१५

सेलू, दि. ३१ जाने. २०१५

नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाचा समारोप दि. २८ जाने. २०१५ रोजी प्रसिद्ध कवी केशव खटिंग  यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण श्री. खटिंग यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. वसंतराव खारकर हे होते. तर व्यासपीठावर डी. के. देशपांडे , डॉ. व्ही. के. कोठेकर, नारायणराव देऊळगावकर, डॉ. प्रवीण जोग आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी  प्रसिद्ध कवी केशव खटिंग म्हणाले, आई आणि शाळा हे संस्काराचे महत्वाचे केंद्र असतात. विचारातून माणूस घडतो. त्यामुळे न्यूनगंड बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी विचार, संस्काराने उत्तम नागरिक पर्यंत करायला हवा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नागेश देशपांडे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा इक्कर व हर्शल शिंदे यांनी केले.अहवाल वाचन एन. पी. पाटील यांनी केले. तर आभार पी. जी. खडसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नंदकुमार बंगाळे, सुर्वे, सुरेश हिवाळे, अतुल पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.