2451 222 750
Selu, Parbhani,
Maharashtra, India - 431503
e-mail:
info@nutansansthaselu.org

Cultural Programmes 2017

नूतन विद्यालय सेलू येथे आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. 8 वा ड वर्गातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यात वर्गातील मुलींनी राखीपौर्णिमेची धार्मिक व सांस्कृतिक माहिती,स्त्रीभ्रूण हत्या विषयी जनजागृती, बहीण भाऊ नातेसंबंध, आजचा दिनविशेष म्हणून चंद्रग्रहणाची माहिती, पर्यावरणपूरक राखी तयार करणे इ. माहिती भाषण, कथा, कविता व गीताच्या माध्यमातून दिली.
 

याप्रसंगी 8 वी ड वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राखीचे व भित्तिपत्रकाचे अनावरण शाळेचे मुख्याध्यापक श्री के.व्ही. वाघमारे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
 

विद्यार्थ्यांना 8 वी ड वर्गाचे वर्गशिक्षक श्री सुनील तोडकर व कलाशिक्षक श्री कटारे सर यांनी मार्गदर्शन केले. skb